Ezra 9:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मी ही प्रार्थना केली: हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहचले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्यांचा धावा करून म्हटले: “हे माझ्या परमेश्वरा, माझे मुख तुमच्याकडे वर करण्याची मला खरोखरच लाज व कलंकित झाल्यागत वाटते. आमच्या पातकांची रास आता आमच्या डोक्यावरून गेली आहे, कारण आमचे अपराध आकाशापर्यंत अमर्यादित झाले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी म्हणालो, “हे देवा, तुझ्याकडे पाहण्याची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकावरून गेली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोहचले आहेत.