Ezra 9:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आमच्या वाडवडीलांच्या वेळे पासून आतापर्यंत आम्ही अनेक पापांचे दोषी आहोत. आमच्या पापांची शिक्षा आमचे राजे आणि याजक यांना भोगावी लागली. परकी राजांनी आमच्यावर आक्रमण करुन आमच्या लोकांना पकडून नेले. आमची संपत्ती लुटून त्या राजांनी आम्हाला लज्जित केले आजही तेच चालले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशय अपराधी आहोत; आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तलवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत; आज आमची स्थिती अशीच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमच्या पूर्वजांपासून आजतागायत आमची अत्यंत घोर पापे झाली आहेत. आमच्या पातकांमुळेच, आम्ही, आमचे राजे, आमचे याजक, गैरयहूदी राजांच्या तलवारीने मारले गेले, आम्हाला कैद करण्यात आले, लुबाडण्यात आले व फजीत करण्यात आले. आजही आमची स्थिती अशीच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या वाडवडिलांच्या वेळेपासून आतापर्यंत आम्ही महान पापांचे दोषी आहोत. आमच्या अपराधांमुळे आमचे राजे आणि याजक यांना या जगिक राजाच्या हाती तलवार व बंदीवास, लुटालुट आणि मुखलज्जेला, आज आम्ही जसे आहोत तसे दिलेत.