Galatians 1:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या यहूदी धर्माच्या पालनाबाबत मी माझ्या वयाच्या लोकांपेक्षा कितीतरी पुढे होतो. माझ्या पूर्वजांनी दिलेल्या शिकवणीविषयी मी त्याला पूर्ण वाहिलेला होतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी फार आवेशी असल्यामुळे माझ्या समाजातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्म पाळण्याच्या बाबतीत मी अधिक प्रगती केली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या लोकांमध्ये माझ्या वयाच्या पुष्कळांपेक्षा मी यहूदी धर्मसंप्रदायात अधिक पुढे जात होतो आणि माझ्या पूर्वजांच्या परंपरेविषयी अत्यंत आवेशी होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथांविषयी पुष्कळ अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ लोंकापेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो.