Galatians 1:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येशूने स्वत:ला आमच्या पापांसाठी दिले. ज्या दुष्ट जगात आम्ही राहतो त्यापासून आम्हांला मुक्त करण्यासाठी त्याने असे केले आणि देव जो पिता त्याची हीच इच्छा होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांनी आपला परमेश्वर आणि पिता यांच्या इच्छेला अनुसरून आमच्या पापांसाठी स्वतःला दिले यासाठी की सध्याच्या दुष्ट जगापासून आम्हाला वाचवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले.