Galatians 2:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले ते हेरण्यासाठी व आम्हांला गुलाम करता यावे म्हणूज ज्या खोट्या विश्वासणाऱ्यांना आत आणणयात आले त्यामुळे हे झाले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
काहींची मात्र तशी इच्छा होती. हे लोक श्रद्धावंत असल्याचे ढोंग करीत होते. ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ते हेरून पाहण्यासाठी हे लोक गुप्तपणे आमच्या संघात सामील झाले होते. आम्ही पुन्हा गुलामगिरीत पडावे अशी त्यांची इच्छा होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळेदेखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हांला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हांला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा प्रश्न खोट्या विश्वासणार्‍यांमुळेच उद्भवला कारण ख्रिस्त येशूंमध्ये आम्हाला जे स्वातंत्र्य आहे, त्याचा शोध घेण्यासाठी आणि आम्हाला गुलाम बनविण्यासाठी काही खोटे विश्वासणारे आमच्यामध्ये घुसले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.