Galatians 2:6 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे लोक महत्त्वाचे आहेत असे लोक समजत होते त्यांच्याकडून मला काहीही मिळाले नाही. जे कोणी ते होते त्यांच्यामुळे मला काही फरक पडला नाही; सर्व माणसे देवासमोर सारखीच आहेत. काहीही असो, त्या प्रतिष्ठित माणसांनी माझ्यामध्ये किंवा माझ्या संदेशांमध्ये कोणतीही भर टाकली नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु जे कोणी नेते म्हणून मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही, देव पक्षपात करीत नाही) त्यांनी माझ्या शुभवर्तमानात काही भर घातली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते, (ते कसेही असोत त्याचे मला काही नाही; माणसाला ‘देव तोंडावरून मानत नाही’) त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्यांना अतिश्रेष्ठ म्हणून मानले जात होते ते काहीही करीत होते तरी मला काही फरक पडला नाही; परमेश्वर पक्षपात करीत नाही. त्यांनी माझ्या संदेशात काहीही भर घातली नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरीही, जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून (ते कसेहि असोत होते त्याचे मला काही नाही; देव मनुष्याचे बाह्य रूप पाहत नाही.) कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही.