Galatians 3:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नियमशास्त्र हे देवाच्या अभिवचनाविरुद्ध आहे, असा याचा अर्थ होतो का? अर्थातच नाही! कारण लोकांना जीवन आणण्यासाठी जर नियमशास्त्र देण्यात आले असेल, तर मग नीतिमत्त्व त्याच नियमशास्त्राद्वारे येईल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? मुळीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते, तर नियमशास्त्र पाळून सर्वांना नीतिमत्व प्राप्त करून घेता आले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग नियमशास्त्र आणि परमेश्वराची अभिवचने परस्परविरोधी आहेत काय? मुळीच नाही! नियमशास्त्र दिल्याने जीवन मिळत असले, तर नीतिमत्व नियमापासून आले असते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्त्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.