Galatians 3:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पवित्र शास्त्राने आधीच सांगितले आहे की, देव विदेशी लोकांना त्यांच्या विश्वासाने नीतिमान ठरवील. त्याने अब्राहामाला पूर्वीच सुवार्ता सांगितली की, “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘देव यहुदीतर लोकांना विश्वासाने नातिमान ठरविणार,’ ह्या धर्मशास्त्रलेखातील भाकितामुळे अब्राहामला पूर्वीच हे शुभवर्तमान सांगण्यात आले होते की, ‘तुझ्यामध्ये यहुदीतर आणि सर्व राष्ट्रे आशीर्वादीत होतील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार, ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, “तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.”1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पवित्र शास्त्राने आधी सांगितले होते की परमेश्वर विश्वासाने गैरयहूदीयांना नीतिमान ठरवतील आणि त्यांनी अब्राहामास आधी शुभवार्तेची घोषणा केली: “तुझ्याद्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’