Galatians 4:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बंधूनो, मी तुम्हांला कळकळीची विनंति करतो की कृपा करुन माझ्यासारखे व्हा. कारण मी तुमच्यासारखा झालो, असे काही नाही की, तुम्ही माझे काही वाईट केले होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही तसा मीही होतो, तुम्ही माझे काही वाईट केले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रिय बंधू व भगिनींनो, माझ्यासारखे व्हा, कारण मी तुमच्यासारखा झालो आहे. तुम्ही माझे काही नुकसान केले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंधूंनो, मी तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही माझ्यासारखे व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही.