Galatians 4:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि माझ्या शारीरिक दुर्बलतेबाबत तुमची कठीण परीक्षा होत असतानाही उलट माझे एखाद्या देवदूतासारखे तुम्ही स्वागत केले, जणू काय मीच स्वत: ख्रिस्त असल्यासारखे स्वागत केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्हांला अडचणीत टाकण्याइतकी माझी प्रकृती बिघडलेली असताना तुम्ही माझा धिक्वार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा, माझा स्वीकार केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तुमची परीक्षा होण्याइतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा, माझा स्वीकार केलात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता, तुम्ही तिरस्कार केला नाही पण माझा देवाच्या दूतासारखा, ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला.