Galatians 4:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही नियमशास्त्र पाळावे असे ज्यांना वाटते त्यांना तुमच्याविषयी उत्साहवर्धक आस्था आहे, पण चांगल्या हेतूसाठी नाही. मझ्यापासून तुम्हांला वेगळे करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. यासाठी की तुम्हांला त्याच्याविषयी उत्साहवर्धक आस्था वाटेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते दुसरे लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला माझ्यापासून वेगळे ठेवू पाहतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे; तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते लोक तुम्हाला आपल्या पक्षात घेण्यास उत्सुक आहेत, पण ते तुमच्या भल्यासाठी नाही. परंतु तुम्ही त्यांचे शिष्य व्हावे, म्हणून ते तुम्हाला आम्हापासून वेगळे करू पाहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात.