Galatians 4:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे नेहमीच चांगले असते की, कोणासाठी तरी विशेष (उत्साहवर्धक) आस्था असावी पण ती कोणत्या तरी चांगल्या गोष्टीसाठी आणि मी जेव्हा तुमच्याबरोबर असतो, फक्त तेव्हाच नव्हे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्हांला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची खटपट करावी हे चांगले आहे, मात्र ते चांगल्या हेतूने करायला हवे. हे सर्वदा खरे आहे आणि केवळ मी तुमच्यांजवळ आहे, तेव्हाच खरे आहे असे नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुम्हांला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे केवळ मी तुमच्याजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आस्था असणे आणि उद्देश चांगला असणे गरजेचे आहे, केवळ मी तुमच्याबरोबर आहे तेव्हाच नव्हे तर नेहमीच असे असणे आवश्यक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर चांगल्या कारणांसाठी सर्वदा आवेशी असणे हे चांगले आणि मी तुम्हाजवळ प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेशी असावे असे नाही.