Galatians 4:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, त्याने जे नियमशास्त्राधीन होते त्यांना सोडवावे व देवाची मुले म्हणून स्वीकारावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा.