Galatians 5:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण जर तुम्ही एकमेकांना चावत राहिला व खाऊन टाकीत असला, तर एकमेकांना गिळून टाकणार नाही, याविषयी सावध राहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा.