Galatians 6:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर मग ज्याप्रमाणे आपणांस संधि मिळेल, तसे सर्व लोकांचे आणि विशेषत: ज्यांनी सुवार्तेवर विश्वास ठेवला आहे त्यांच्या घराण्याचे चांगले करु या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग आपणाला ज्याप्रमाणे संधी मिळेल, त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः श्रद्धेमुळे जे आपल्या परिवाराचे सदस्य झाले आहेत, त्यांचे हित साधावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्यांच्या कुटुंबाचे चांगले करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.