Genesis 1:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा देव बोलला, “हिरवळ, बीज देणारी वनस्पती आणि आपापल्यापरी सबीज फळे देणारी फळझाडे भूमी आपल्यावर उपजवो;” आणि तसे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग परमेश्वराने म्हटले, “भूमीतून वनस्पतीचा उपज होवो: निरनिराळी रोपे व झाडे, फळे देणारी व त्या फळातच स्वजातीचे बीज असणार्‍या फळझाडांचा भूमीतून उपज होवो” आणि तसे घडून आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव बोलला, “हिरवळ, बीज देणाऱ्या वनस्पती, आणि आपआपल्या जातीप्रमाणे, ज्यात त्याचे बीज आहे अशी फळे देणारी फळझाडे, ही पृथ्वीवर येवोत.” आणि तसेच झाले.