Genesis 10:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ही नोहाच्या मुलांची व त्यांच्या वंशजांची, पिढ्या व कुळाप्राणे यादी आहे; त्यांच्या राष्ट्रांप्रमाणे ती आखलेली आहे; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर वेगवेगळी राष्ट्रे झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिढ्या व राष्ट्रे ह्यांपरत्वे ही नोहाच्या वंशजांची कुळे सांगितली आहेत; जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्नभिन्न राष्ट्रे झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वर दिलेल्या यादीत नमूद केलेले सर्व लोक नोआहच्या अनेक पिढ्यांतील गोत्र होते. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रांत वस्ती केली. ही सर्व राष्ट्रे जलप्रलयानंतर पसरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.