Genesis 16:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.” अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
साराय अब्रामाला म्हणाली, “पाहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे; तर माझ्या दासीपाशी जा; कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल,” तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सारायने अब्रामाला म्हटले, “याहवेहने मला मूलबाळ दिले नाही, म्हणून तू माझ्या दासीचा स्वीकार कर; म्हणजे तिच्यापासून माझी मुले होतील.” आणि अब्रामाने तिचा शब्द मानला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून वंचित ठेवले आहे. तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा. कदाचित तिच्यापासून मला मुले मिळतील.” अब्रामाने आपली पत्नी साराय हिचे म्हणणे मान्य केले.