Genesis 17:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन दिले व त्यास म्हटले, “मी सर्वशक्तिमान देव आहे. माझ्या समक्षतेत चाल, आणि सात्त्विकतेने राहा.