Genesis 17:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जन्मलेल लहान मुलगा आठ वर्षांचा होईल तेव्हा तू त्याची सुंता करावी; तुझ्या कुटुंबात जन्मलेल्या तसेच दुझ्या दासाच्या किंवा गुलामांच्या कुटुंबात जन्मलेल्या हरएक पुरुषाची सुंता करावी;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष आठ दिवसांचा झाला की त्याची सुंता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला, परक्यांपासून पैसे देऊन विकत घेतलेला असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पिढ्यानपिढ्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची त्याच्या जन्मानंतर आठ दिवसानी सुंता करावी. मग तो पुरुष तुझ्या कुटुंबात जन्मलेला असो किंवा तो तुझ्या वंशातला नसून परक्यापासून पैसा देऊन घेतलेला असो.