Genesis 18:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्या बोलण्याचा तुला राग न यावा; मला आणखी विचारण्याची परवानगी असावी; तेथे फक्त तीसच लोक चांगले असतील तर? तू त्या नगराचा नाश करशील काय?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तर मी तसे करणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तो म्हणाला, “प्रभूला राग येऊ नये, पण मला बोलू द्यावे. फक्त तीसच मिळाले तर?” याहवेहने उत्तर दिले, “तिथे तीस सापडले, तरी मी नाश करणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून तुला राग न यावा म्हणजे मी बोलेन. तेथे फक्त तीसच मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तरीही मी तसे करणार नाही.”