Genesis 18:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?” परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग तो म्हणाला, “प्रभूला राग न येवो, पण मला एकदाच बोलू द्यावे. तिथे फक्त दहाच सापडले तर?” याहवेहने उत्तर दिले, “त्या दहांच्यासाठी मी त्याचा नाश करणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेवटी तो म्हणाला, “प्रभू, कृपा करून माझ्यावर रागावू नकोस, मी शेवटी एकदाच बोलतो. कदाचित तुला तेथे दहाच लोक मिळाले तर?” परमेश्वर म्हणाला, “त्या दहांकरताही मी नगराचा नाश करणार नाही.”