Genesis 19:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग संध्याकाळी ते दोघे दूत सदोम येथे आले, तेव्हा लोट सदोमाच्या वेशीत बसला होता; त्यांना पाहून लोट उठून सामोरा गेला; आणि भूमीपर्यंत तोंड लववून त्याने त्यांना नमन केले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच संध्याकाळी ते दोन दूत सदोमास पोहोचले. लोट नगराच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि आपले डोके भूमीकडे लववून त्याने दंडवत घातले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संध्याकाळी ते दोन देवदूत सदोमास आले, त्या वेळी लोट सदोमाच्या वेशीजवळ बसला होता. लोटाने त्यांना पाहिले, तो त्यांना भेटण्यास उठला, आणि त्याने भूमीपर्यंत तोंड लववून त्यांना नमन केले.