Genesis 19:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे व संबंध खोऱ्यातील तळवटीच्या प्रदेशाकडे नजर टाकली तेव्हा तो अवघा प्रदेश म्हणजे भल्यामोठ्या अग्नीच्या ज्वालांनी व धुराच्या लोटांनी भरलेला त्याला दिसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने सदोम व गमोरा आणि अवघा तळवटीचा प्रदेश ह्यांच्याकडे नजर फेकली तर पाहा, त्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर वर चालला होता!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने मैदानापलीकडे असलेल्या सदोम आणि गमोरा याकडे नजर टाकली, भट्टीतून निघाल्यासारखे धुरांचे लोटच्या लोट त्या नगरातून उसळून वर येत आहेत, असे त्याला दिसले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे आणि खोऱ्यातील सर्व प्रदेशाकडे पाहिले. त्याने पाहिले तेव्हा पाहा, त्या अवघ्या प्रदेशातून भट्टीच्या धुरासारखा धूर त्या प्रदेशातून वर चढताना त्यास दिसला.