Genesis 19:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने त्या खोऱ्यातील नगरांचा अशा रीतीने नाश केला परंतु तो करीत असताना, अब्राहामाने त्याला विचारलेल्या गोष्टींची त्याने आठवण ठेवली; लोट (अब्राहामचा पुतण्या) दरीतील नगरांत राहात होता. पण नगरांचा नाश करण्यापूर्वी देवाने लोटाला तेथून दूर पाठवून दिले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे देवाने त्या तळवटीतील नगरांचा नाश केला. त्या वेळी देवाने अब्राहामाची आठवण केली, आणि लोट राहत होता तेथल्या नगरांचा नाश करतेवेळी लोटाला त्या नाशातून वाचवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने जेव्हा त्या खोऱ्यातील नगरांचा नाश केला तेव्हा अब्राहामाची आठवण केली. त्याने लोट राहत होता त्या नगरांचा नाश करण्यापूर्वी लोटाला त्या नाशातून काढले.