Genesis 19:37 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थोरल्या मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले; आजतागायत राहात असलेल्या मवाबी लोकांचा हा मूळ पुरुष,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
थोरल्या मुलीला मुलगा झाला, त्याचे नाव तिने मवाब असे ठेवले; आजमितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वडील मुलीला मुलगा झाला, तेव्हा तिने त्याचे नाव मवाब ठेवले. आजपर्यंत जे मवाबी लोक आहेत, त्यांचा हा मूळ पुरुष.