Genesis 19:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला व त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते निजण्यापूर्वीच त्या नगराच्या माणसांनी, म्हणजे सदोमाच्या माणसांनी, तरुणापासून ते म्हातार्‍यापर्यंत, अशा सगळ्या लोकांनी चोहोकडून येऊन त्या घराला गराडा घातला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते झोपण्याच्या आधी, सदोम शहराच्या प्रत्येक भागातील सर्व पुरुषांनी—तरुणांपासून वृद्धांपर्यंत—लोटाच्या घराला वेढा घातला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु ते झोपण्यापूर्वी, त्या नगरातील मनुष्यांनी, सदोम नगराच्या सर्व भागातील तरुण व वृद्ध अशा सर्व माणसांनी लोटाच्या घराला वेढले.