Genesis 20:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आता तू अब्राहामाची बायको त्याची त्याला परत दे; अब्राहाम माझ्या वतीने बोलणारा संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील; परंतु तू सारेला अब्राहामाकडे परत पाठवले नाहीस तर मग मी सांगतो की तू आणि तुझ्या बरोबर तुझे सर्व कुटुंबीय खात्रीने मराल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता त्या मनुष्याची बायको त्याला परत दे, कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील आणि तू वाचशील. पण जर तू तिला परत दिले नाहीस, तर तू व तुझे जे आहेत ते सगळे खचीत मरतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आता तू अब्राहामाची पत्नी सारा ही त्यास परत दे; कारण तो संदेष्टा आहे; तो तुझ्यासाठी प्रार्थना करील व तू वाचशील. परंतु तू तिला त्याच्याकडे परत पाठवले नाहीस, तर तू आणि तुझ्या बरोबर जे सर्व तुझे आहेत ते खात्रीने मरतील, हे लक्षात ठेव.”