Genesis 21:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुसऱ्या दिवशी सकाळी अब्राहामाने भाकरी व पाण्याची पिशवी आणून हागारेला दिली; ती शिदोरी व आपला मुलगा घेऊन हागार तेथून निघाली आणि अब्राहामाने तिची रवानगी केली; हागार तेथून निघून बैर - शेबाच्या वाळवंटात भटकत राहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर अब्राहामाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले; ती निघून बैर-शेबाच्या रानात भटकत राहिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुसर्या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहाम सकाळीच लवकर उठला, भाकरी व पाण्याची कातडी पिशवी घेतली आणि हागारेला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली. त्याने तिचा मुलगा तिला दिला आणि तिला पाठवून दिले. ती गेली आणि बैर-शेबाच्या रानामध्ये भटकत राहिली.