Genesis 21:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग देवाने हागारेला पाण्याची विहीर दिसू दिली. तेव्हा हागार त्या विहिरीपाशी गेली आणि तिने मसक पाण्याने भरली, नंतर आपल्या तहानलेल्या मुलाला तिने पाणी पाजिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग देवाने तिचे डोळे उघडले. पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला; तेव्हा तिने जाऊन मसकेत पाणी भरले व मुलाला पाजले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग परमेश्वराने तिचे डोळे उघडले आणि तिला एक पाण्याची विहीर दिसली. तेव्हा तिने आपली पाण्याची मसक भरून घेतली आणि त्या मुलाला पाणी पाजले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग देवाने हागारेचे डोळे उघडले आणि तिने पाण्याची विहीर पाहिली. ती गेली आणि पाण्याची कातडी पिशवी भरून घेतली आणि मुलाला पाणी प्यायला दिले.