Genesis 21:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आता देवासमोर येथे मला वचन दे की तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या संतानाशी न्यायनीतीने वागशील असा माझ्याशी करार कर; तू माझ्याशी व ज्या ह्या माझ्या देशात तू राहिलास त्या देशाशी दयाळूपणे राहशील, असे वचन दे, तसेच मी जसा तुझ्याशी दयाळूपणाने वागलो तसाच तूही माझ्याशी दयाळूपणाने राहशील असे वचन तू मला दे, व असा करार तू माझ्याशी कर.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तुम्ही मला आता येथे देवाच्या शपथेवर असे म्हणा: मी तुमच्याशी, तुमच्या पुत्रपौत्रांशी कपट करणार नाही, आणि जशी तुम्ही माझ्यावर कृपा केली तशी मी तुमच्यावर व ज्या देशात मी उपरा होऊन राहिलो आहे त्या ह्या देशावर कृपा करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर परमेश्वराच्या नावाने तू मला असे वचन दे की, तू माझ्याशी, माझ्या मुलांशी किंवा वंशजांशी कपटनीतीने वागणार नाहीस. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी मित्रत्वाने वागलो आहे, त्याप्रमाणेच तूही माझ्या देशाशी मित्रत्वानेच वागशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आता येथे देवाची शपथ वाहा की, तू माझ्याशी व माझ्यामागे माझ्या मुलांशी किंवा माझ्या वंशजाशी खोटेपणाने वागणार नाहीस. जसा मी तुझ्याशी करार करून विश्वासूपणाने राहिलो, तसाच तू माझ्याशी व ज्या या माझ्या देशात तू राहिलास त्याच्याशी राहशील.”