Genesis 23:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अब्राहाम सर्व लोकांसमक्ष एफ्रोनास म्हणाला, “परंतु मला त्या शेताची पूर्ण किंमत तुला देऊन ते विकत घ्यायचे आहे; त्याचे पैसे माझ्याकडून घे आणि मग मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे एवढे अवश्य ऐक. मी शेताचे पैसे देतो ते माझ्याकडून घे म्हणजे मी आपल्या मयतास तेथे मूठमाती देईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि त्या देशाच्या लोकांसमक्ष तो एफ्रोनास म्हणाला, “माझे ऐका, मला ती जागा तुझ्याकडून विकत घेऊ दे; त्या शेताची सर्व किंमत मी तुला देईन. मग मी माझ्या मृताला तिथे मूठमाती देईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देशातले लोक ऐकत असता तो एफ्रोनास म्हणाला, “परंतु जर तुझी इच्छा आहे, तर कृपा करून माझे ऐक. मी शेताची किंमत तुला देईन. माझ्याकडून त्याचे पैसे घे, आणि मग मी आपल्या मयतास तेथे पुरेन.”