Genesis 23:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“माझे स्वामी, माझे जरा ऐका; जमिनीची किंमत 10 पौंड चांदी आहे ही किंमत तुम्हाला व मला म्हणजे काय मोठे? तेव्हा त्यापेक्षा सरळ माझे शेत ताब्यात घ्या व तेथे तुमच्या बायकोला मूठमाती द्या.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“स्वामी माझे ऐका: ही अवघी चारशे शेकेल रुपे किंमतीची जमीन, तिचे काय मोठे? आपण आपल्या मयतास मूठमाती द्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“महाराज, त्या जागेची किंमत केवळ चांदीची चारशे शेकेल आहे; पण तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचे काय? तिथे आपल्या मृताला मूठमाती द्या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“माझे स्वामी, कृपया माझे जरा ऐका. जमिनीचा हा एक तुकडा चारशे शेकेल रुपे किंमताचा, तो माझ्या व तुमच्यामध्ये एवढा काय आहे? तुमच्या मृताला पुरा.”