Genesis 23:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या मालकीच्या शेताच्या एका टोकाला असलेली मकपेला येथील गुहा विकत घेणे मला आवडेल; मी तिची पुरेपूर किंमत त्याला देतो, व ती माझ्या मालकीची स्मशानभुमि म्हणून विकत घेतो; त्या बद्दल तुम्ही सर्वजण साक्षी असावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या शेताच्या सीमेच्या आत असलेली त्याची मकपेला नावाची गुहा आहे, ती माझ्या मालकीचे कबरस्तान व्हावे म्हणून त्याने तुमच्या समक्ष पुरी किंमत घेऊन मला द्यावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या मालकीची शेताच्या एका टोकाला असलेली मकपेलाची गुहा मला विकत द्यायला सांगा. ती त्याने पूर्ण किंमतीस मला उघडपणे माझ्या मालकीची मृतांना पुरण्याची जागा म्हणून विकत द्यावी.”