Genesis 24:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु माझ्या बापाच्या देशात त्याच्या घरी तू जाशील आणि ते माझ्या मुलाकरीता नवरी मुलगी द्यावयाचे नाकारतील तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील; मुलगी देण्यास ते कबूल झाले नाहीत तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रमाणे करण्यास तू वचनबद्ध आहेस. जेव्हा तू माझ्या घराण्याकडे जाशील आणि त्यांनी मुलगी पाठविण्याचे नाकारले, तर तू तुझ्या शपथेतून मुक्त होशील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जेव्हा तू माझ्या नातलगांमध्ये जाशील आणि जर त्यांनी तुला ती दिली नाही, तर मग तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.’