Genesis 24:49 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आता तुम्ही मला सांगा; तुम्ही माझ्या धन्याशी खरेपणाने आणि दयाळूपणाने वागाल का? आणि तुमची मुलगी त्याला देता का? की मुलगी देण्यास नकार देता? बोला, काय करता हे मला नक्की सांगा म्हणजे मग मी काय करावे हे मला समजेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असलात तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता माझ्या धन्यावर दया आणि विश्वासूपणा दाखवून जे योग्य ते करण्याची तुमची तयारी आहे की नाही हे मला नक्की सांगा, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मला ठरविता येईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आता तुम्ही माझ्या धन्याशी प्रामाणिकपणाने आणि सत्याने वागण्यास तयार असाल तर मला सांगा. परंतु जर नाही तर तसे मला सांगा; यासाठी की मी उजवीकडे किंवा डावीकडे वळेन.”