Genesis 25:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशी इश्माएलाच्या पुत्रांची नावे होती; प्रत्येक मुलाच्या परिवार गटाचा एक तळ होता; पुढे त्याचेच एक गांव बनले; हे बारा पुत्र आपापल्या लोकासहीत बारा वंशाचे संस्थापक सरदार झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे इश्माएलचे मुलगे; त्यांच्या गावांवरून व त्यांच्या गोटांवरून त्यांना पडलेली ही नावे. हे आपापल्या वंशाचे बारा सरदार होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे इश्माएलाचे पुत्र होते आणि त्यांच्या गावांवरून आणि छावण्यांनुसार हे बारा वंशाचे प्रधान झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले.