Genesis 25:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एके दिवशी एसाव शिकारीहून परत आला; तो फार थकलेला होता व भुकेने अगदी गळून गेला होता. याकोब मसुरीच्या लाल डाळीचे वरण शिजवीत होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एकदा याकोब वरण शिजवत असता एसाव रानातून थकूनभागून आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकदा याकोब वरण शिजवित असताना एसाव शिकारीहून खूप थकूनभागून आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता.