Genesis 26:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याच्या बरेच वर्षे आधी अब्राहामाने आपल्या हयातीत बऱ्याच विहिरी खणल्या होत्या; परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या; त्यामुळे इसहाकाने मागे जाऊन त्या परत खणून घेतल्या त्या विहिरींना त्याच्या वडीलांनी दिलेली नावच पुन्हा त्याने दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यांना पुन्हा दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इसहाकाने आपला पिता अब्राहाम याने खणलेल्या आणि अब्राहामाच्या मृत्यूनंतर पलिष्टी लोकांनी बुजवून टाकलेल्या सर्व विहिरी पुन्हा खणल्या. अब्राहामाने विहिरीना जी नावे दिली होती तीच नावे त्याने पुनः दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहामाने आपल्या दिवसात ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या, परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या त्या पुन्हा एकदा इसहाकाने खणून घेतल्या, आणि त्याच्या वडिलाने दिलेली नावेच पुन्हा त्याने दिली.