Genesis 26:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी हुज्जत घातली; ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” त्या लोकांनी आपल्याशी त्या जागी भांडण केले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव ‘एसेक’ ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा गरार येथील गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले व म्हणाले की, “हे पाणी आमचे आहे.” त्यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक (कलह) असे ठेवले; कारण त्यांनी त्याच्याशी कलह केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग गरारचे गुराखी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडले आणि म्हणाले, “हे पाणी आमचे आहे!” म्हणून त्याने विहिरीला एसेक असे नाव दिले; कारण त्यांचे त्याच्याशी भांडण झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडणे केली, ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” ते त्याच्याशी भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव “एसेक ” ठेवले.