Genesis 26:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इसहाक तेथुन पुढे गेला आणि त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा मात्र कोणीही भांडण करावयास आले नाही म्हणून इसहाकाने तिचे नाव ‘रहोबोथ’ ठेवले. इसहाक म्हणाला, “आता मात्र परमेश्वराने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे; आता या देशात आमची भरभराट होईल; आणि आम्हाला यश मिळेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ (विस्तार) असे ठेवले, आणि तो म्हणाला, “परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता ह्या देशात आमची वाढ होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर इसहाकाने आणखी एक विहीर खणली, पण त्यावेळी कोणाशीही भांडण झाले नाही. म्हणून त्याने त्या विहिरीचे नाव रेहोबोथ असे ठेवले. तो म्हणाला, “आता तरी याहवेहने आम्हाला जागा दिली आहे. आता आमची या देशात भरभराट होईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तेथून निघाला आणि त्याने आणखी एक विहीर खणली, परंतु तिच्यासाठी ते भांडले नाहीत म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ ठेवले. आणि तो म्हणाला, “आता परमेश्वरने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे, आणि देशात आमची भरभराट होईल.”