Genesis 26:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आम्ही तुला त्रास दिला नाही त्याच प्रमाणे आता तुही आम्हाला त्रास देणार नाही असा तू आमच्याशी करार करावा; आम्ही तुला घालवून दिले हे खरे आहे, परंतु तुला आम्ही शांतीने जाऊ दिले; परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आम्ही तुम्हांला काही उपद्रव केला नाही; आम्ही केवळ तुमचे बरे केले व तुम्हांला शांतीने रवाना केले, तसे तुम्ही आमचे काही वाईट करू नये; आता तुमच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही जसा तुला कसलाही उपद्रव दिला नाही, तसा तू आम्हाला कसलाही उपद्रव देणार नाहीस, असे वचन दे. उलट आम्ही तुझे भलेच केले आणि तुला शांतीने जाऊ दिले; आणि आता तू याहवेहद्वारे आशीर्वादित झाला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे आम्ही तुझी हानी केली नाही, आणि आम्ही तुझ्याशी चांगले वागलो आणि तुला शांतीने पाठवले, तशी तू आम्हास हानी करू नको. खरोखर परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे.”