Genesis 26:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बराच काळ तेथे राहिल्यावर एकदा खिडकीतून बाहेर पाहताना इसहाक रिबकेशी प्रेमाचे खेळ खेळण्यात रंगल्याचे अबीमलेखाला दिसले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तेथे बराच काळ राहिल्यावर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने खिडकीतून पाहिले तर इसहाक आपली बायको रिबका हिच्याशी प्रणयलीला करताना त्याच्या दृष्टीस पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो तिथे बराच काळ राहिल्यानंतर एके दिवशी पलिष्ट्यांचा राजा अबीमेलेख याने खिडकीतून बाहेर पाहिले की तो इसहाक आपली पत्नी रिबेकाह हिच्याशी प्रेम करीत आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाक बराच काळ तेथे राहिल्यावर, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने एकदा खिडकीतून बाहेर पाहताना पाहिले की, इसहाक त्याच्या पत्नीला रिबकेला प्रेमाने कुरवाळत आहे.