Genesis 27:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग इसहाक अतिशय अस्वस्थ झाला; तो म्हणाला, “तर मग तू येण्याअगोदर ज्याने जेवण तयार करुन मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व जेवण खाल्ले आणि त्याला आशीर्वादही दिला. तो आशीर्वाद मागे घेण्यास आता फार उशीर झाला आहे; तो त्याला मिळणार.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा इसहाक अतिशय कंपायमान होऊन म्हणाला, “तर पारध करून आणलेल्या हरणाचे मांस घेऊन माझ्याकडे जो आला, आणि तू येण्यापूर्वी मी ते खाऊन ज्याला आशीर्वाद दिला तो कोण? तो आशीर्वादित होणारच.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचवेळी इसहाकाच्या शरीराला भयंकर कंप सुटला आणि तो म्हणाला, “तर मग आताच शिकार घेऊन माझ्याकडे आला होता तो कोण होता? तू येण्यापूर्वी मी तर ते खाल्ले आणि माझे आशीर्वादही त्याला दिले. होय, त्याला ते आशीर्वाद आता मिळणारच.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग इसहाक भीतीने थरथर कापत म्हणाला, “तर मग तू येण्या अगोदर ज्याने मांस तयार करून मला आणून दिले तो कोण होता? मी ते सर्व खाऊन त्यास आशीर्वाद दिला. खरोखर तो आशीर्वादित होईल.”