Genesis 27:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इसहाकाने उत्तर दिले, “नाही बाळा, आता फार उशीर झाला आहे; मी याकोबाला तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे बंधू तुझे सेवक होतील असाही आशीर्वाद दिला आहे; त्याच प्रमाणे त्याला भरपूर धान्य व द्राक्षारस मिळावा असाही आशीर्वाद दिला आहे; तेव्हा माझ्या बाळा, आता तुला द्यावयाला काही राहिले नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा इसहाकाने उत्तर दिले, “पाहा, मी त्याला तुझा स्वामी करून ठेवले आहे, त्याचे सर्व भाऊबंद त्याचे सेवक केले आहेत आणि धान्य व द्राक्षारस ह्यांच्या योगे त्याला मी समृद्ध केले आहे; तर माझ्या मुला, आता तुझ्यासाठी मी काय करू?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इसहाकाने एसावास उत्तर दिले, “मी त्याला तुझा धनी आणि तुझ्या सर्व नातेवाईकांना त्याचे नोकर करून ठेवले आहे. मी त्याला भरपूर धान्य आणि द्राक्षारस यांची हमी दिली आहे. आता देण्याचे काय शिल्लक राहिले आहे, माझ्या मुला?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाकाने एसावास उत्तर दिले आणि म्हणाला “पाहा, मी त्यास तुझ्यावर धनीपणा करण्याचा अधिकार दिला आहे, आणि तुझे सर्व बंधू त्याचे सेवक होतील. आणि त्यास मी धान्य व नवा द्राक्षरस दिला आहे. माझ्या मुला, मी तुझ्यासाठी काय करू.”