Genesis 27:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर आपला आशीर्वाद हिरावून घेतल्याबद्दल एसाव याकोबाचा द्वेष करु लागला; एसाव विचार करुन स्वत:शीच म्हणाला, “लवकरच माझा बाप मरुन जाईल आणि बापाच्या वियोगामुळे मला दु:ख होईल; परंतु त्यानंतर मात्र मी याकोबाला ठार मारीन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोबाला आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले; एसावाने आपल्या मनात म्हटले, “माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत; त्यानंतर मी आपला भाऊ याकोब ह्याला जिवे मारीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसाव याकोबाचा त्याच्या पित्याने आशीर्वाद दिल्यामुळे द्वेष करू लागला. तो स्वतःशीच म्हणाला, “माझ्या वडिलांसाठी शोक करण्याचे दिवस जवळ आले आहे; मग मी माझा भाऊ याकोबाचा वध करेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.”