Genesis 27:42 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोबाला ठार मारण्याचा बेताचा रिबकेला सुगावा लागला; तेव्हा तिने त्याला बोलावून घेतले; मग ती त्याला म्हणाली, “माझ्या बाळा, ऐक, तुझा भाऊ तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला वडील मुलगा एसाव ह्याचे हे म्हणणे रिबकेला कोणी कळवले तेव्हा तिने आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला बोलावून म्हटले, “पाहा, तुला जिवे मारण्याचा बेत करून तुझा भाऊ एसाव आपले समाधान करून घेत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु एसावाचा बेत कोणीतरी रिबेकाहच्या कानावर घातला. रिबेकाहने याकोबाला बोलाविले आणि त्याला सांगितले, “एसावाने तुझा जीव घेऊन, सूड घेण्याची धमकी दिली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रिबकाला तिच्या वडील मुलाचे शब्द कोणी सांगितले. म्हणून तिने आपला धाकटा मुलगा याकोब याला निरोप पाठवून बोलावले आणि मग ती त्यास म्हणाली, “पाहा, तुझा भाऊ एसाव तुला ठार मारण्याचा बेत करीत आहे व स्वतःचे समाधान करून घेत आहे.