Genesis 27:46 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग रिबका इसहाकाला म्हणाली, “तुमचा मुलगा एसाव याने हेथी स्त्रीयांशी लग्न केले, मला त्यांच्यामुळे जीव नकोसा झाला आहे, कारण त्या काही आपल्यापैकी नाहीत; जर याकोबाने ही यांच्या सारख्या स्थानिक स्त्रीयांशीं लग्न केले तर मात्र मी मेलेलीच बरी.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा रिबका इसहाकाला म्हणाली, “ह्या हेथींच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; ह्यांच्यासारखी हेथींच्या मुलींतली, ह्या देशाच्या मुलींतली एखादी बायको याकोबाने करून घेतली तर मला जगून काय लाभ?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर रिबेकाह इसहाकास म्हणाली, “या हेथी मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे. याकोबानेही त्यांच्यापैकीच एकीशी लग्न केले तर माझ्या जगण्याचा काही उपयोग नसेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग रिबका इसहाकाला म्हणाली, “हेथीच्या मुलींमुळे मला जीव नकोसा झाला आहे. याकोबाने जर या देशाच्या मुली करून हेथाच्या लोकांतून पत्नी केली तर माझ्या जगण्याचा काय उपयोग?”