Genesis 28:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तसेच परमेश्वराने अब्राहामाला व त्याच्या संततीला जसा आशीर्वाद दिला तसाच आशीर्वाद त्याने तुला व तुझ्या संततीलाही द्यावा अशी मी प्रार्थना करतो; आणि मी आणखी अशी ही प्रार्थना करतो की जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहातोस त्या देशाचा त्याने तुला मालक करावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तुला व तुझ्याबरोबर तुझ्या संततीला अब्राहामाला दिलेला आशीर्वाद देवो, म्हणजे देवाने अब्राहामाला दिलेला देश, ज्यात तू हल्ली उपरा आहेस, तो तुझे वतन होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्राहामाला जे आशीर्वाद परमेश्वराने दिले, ते तुझ्या वंशजाला लाभोत, ज्या भूमीवर तू आता परदेशी म्हणून राहत आहेस, ती भूमी तुझ्या मालकीची होवो, कारण परमेश्वराने ती अब्राहामाला दिलेली आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्राहामाचे आशीर्वाद देवो, आणि जो हा देश परमेश्वराने अब्राहामाला दिला व ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो.”