Genesis 28:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, व याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसावाने पाहिले की, इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पदन-अराम येथील बायको करण्यासाठी तिकडे पाठवले आहे; आणि आशीर्वाद देताना त्याने त्याला बजावले आहे की कनानी मुलींपैकी बायको करू नकोस;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाला समजले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देऊन पद्दन-अराम येथे पत्नी करण्यासाठी पाठविले आहे, आणि जेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला, तेव्हा त्याला आज्ञा दिली की तू कनानी मुलीशी विवाह करू नको,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला, व पदन-अरामातून पत्नी करून घेण्यासाठी तिकडे पाठवले. त्याने हे देखील पाहिले की, इसहाकाने त्यास आशीर्वाद दिला आणि आज्ञा देऊन म्हणाला की, “तू कोणत्याच कनानी स्त्रियांतली पत्नी करू नये.”